नबीरा महाविद्यालय काटोल ,रसायनशास्त्र विभागामार्फत पर्यावरणपूरक दिवाळी स्टॉलचे उद्घाटन झाले.
हास्य, रोषणाई, ब बीज फटाके, इकोफ्रेंडली रांगोळी आणि हर्बल कुमकुमसह ही दिवाळी साजरी करा.
एमएस्सी रसायनशास्त्र सेम-१ च्या विद्यार्थ्यांनी बीज फठाके (सीड क्रॅकर्स), पर्यावरणपूरक रांगोळी आणि हर्बल कुमकुम तयार करून विकली. विद्यार्थ्यांसाठी हा एक हरित उपक्रम आणि उद्योजकता उपक्रम होता, ज्यांच्या विक्रीतून विद्यार्थानी कमाई केली. पर्यावरणपूरक दिवाळी स्टॉलचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. सुनीलकुमार नवीन, डॉ. पुनित राऊत (आयक्यूएसी समन्वयक) यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी विभागप्रमुख डॉ.निलेश गंधारे, प्रा.निलेश जाधव, प्रा.कैलास मोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, केमिस्ट्री क्लबचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.